गडचांदूरच्या हुसना शेख व संतोषी लेनगुरेची अखिल भारतीय विद्यापीठ धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेसाठी निवड


कोरपना:- दरवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खेळगुणांना चालना देण्याकरिता विद्यापीठातर्फे खेळाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील गोंडवाना विद्यापीठातर्फे विविध खेळाचे आयोजन केले गेले होते. 

 धनुर्विद्या (आर्चरी)  खेळात विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याने शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूरच्या हुसना शेरू शेख व संतोषी भारत लेनगुरे हिची अखिल भारतीय विद्यापीठस्तरीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. हुसना शेख व संतोषी लेनगुरे हि आता गुरूकुल काशी विद्यापीठ, भटिंडा पंजाब येथे २३ ते २८ डिसेंबरला होणाऱ्या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे  प्रतिनिधित्व करीत आहे.

 तिने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य सिंग सर, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख सिंग सर, कोच श्याम कोरडे, आई-वडील व परीवारांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या