Top News

करंट लावुन शिकारीचा प्रयत्न करणार्‍या दोन आरोपींना अटक #chandrapur #gadchiroliचामोर्शी:- चामोर्शी वनपरिक्षेत्राअंतर्गत सोनापुर नियतक्षेत्रात 19 डिसेंबरच्या रात्री जंगल परिसरात अवैध करंट लावल्याप्रकरणी वनअधिकार्‍यांनी दोन आरोपींना अटक केली. शंकर सुखरंजन घरामी व प्रशांत संतोष सिकदर दोघेही रा. श्रीनिवासपुर अशी आरोपींची नावे आहेत.

सोनापूर नियतक्षेत्रात करंट लावला असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली असता, सोनापूर नियत क्षेत्रातील कंपार्टमेंट नं.1553 मध्ये सामूहिक गस्त करीत पाळत ठेवण्यात आली. दरम्यान रात्रीच्या सुमारास जंगल परिसरात दोन संशयित इसम आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी जंगल परिसरात विद्युत करंट लावुन शिकार करण्यासाठी आलेलो आहोत असे सांगितले.

याप्रकरणी शंकर घरामी व प्रशांत सिकदर यांच्याविरुध्द वनगुन्हा क्रमांक 08173/204306/06/2022 अन्वये नोंद करून दोघांनाही अटक करण्यात आली. 21 डिसेंबर रोजी त्यांना चामोर्शीचे न्यायदंडाधिकारी यांच्या दालनात हजर करण्यात आले असता आरोपींना जामिन मंजुर झाला.

या घटनेचा पुढील तपास आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलीया, आलापल्लीचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी प्रदिप बुधनवर यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. इंनवाते यांच्या नेतृत्वात चामोर्शीचे क्षेत्र सहाय्यक ए. व्ही. लिंगमवार, भाडभिडीचे क्षेत्र सहाय्यक व्हि. एस.चांदेकर, वनपाल, मुंजूमकर, सोनापूरचे वनरक्षक जे. ए. निमसरकार, चामोर्शीचे वनरक्षक आनंद साखरे, कैलास नैताम, विठ्ठल मेश्राम, किशोर वैरागडे, विकास लांजेवार, वनरक्षक कोसरे, वनमजूर ईश्‍वर जनबंधू, जगदिश उडान आदी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने