17 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या #chandrapur #suicide

Bhairav Diwase

चंद्रपुर:- शहरातील पंचशील चौकात राहणाऱ्या एका 17 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मोहीत शंकर मलीक वय 17 वर्ष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पंचशील चौकात मोहीत मलीक आपल्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरातील युवकांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तात्काळ रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहेत.