ज्योती सावित्रीमाई यांचे विचारांचे वारस व्हा:- डॉ अभिलाषा गावतुरे #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase


गोंडपिपरी:- गोजोली तह गोंडपीपरी जि चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारकाचे अनावरण सोहळा डॉक्टर अभिलाषा गावतुरे आणि प्रबोधनकार ॲड. संभाजी बोरुडे अहमदनगर यांच्या हस्ते संपन्न झाले यानिमित्त दोन दिवस विविध सामाजिक उपक्रम व सत्यशोधक समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ अभिलाष गावतुरे यांनी विचार व्यक्त करतांना समाज परिवर्तनाच्या लढ्यात म ज्योतिराव फुले व सावित्री माई फुले यांचे विचारांचे वारस व्हा व आपल्या हक्क अधिकारा साठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवा लोकच सशक्त लोकशाही निर्माण करू शकतात लोकशाही वर आघात करणाऱ्याना त्यांची जागा दाखवा असे मत व्यक्त केले.

ॲड. संभाजी बोरुडे मार्गदर्शन पर भाषणात खरा इतिहास समजून घेण्यासाठी व महापुरुषांचे विचार कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज असल्याचे बोलले,

याप्रसंगी डॉ सचिन भेदे, डॉ संजय घाटे, डॉ राकेश गावतुरे, प्रा विजय लोनबले, डॉ समीर कदम, ऍड प्रशांत सोनूले, दिनकर मोहूर्ले, प्रतिष्ठित चांदेकर परिवार, शशिकला गावतुरे, नामदेव गावतुरे, छायाताई सोनूले, संगीताताई पेटकुले,सरपंच गिरीधर कोटनाके, मारोती शेंडे, अशोक मांदाडे इ मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास ठाकरे संचालन बळीराज निकोडे तर आभार प्रदर्शन सुनील सोनूले यांनी केले सोहळा यशस्वी करण्यासाठी साठी जय ज्योती माळी समाज व सावित्रीबाई महिला मंडळ गोजोली सर्व कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले.