Top News

367 लोकांना मिळाले मोफत विधी सहाय्य #chandrapurचंद्रपूर:- विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील कलम 12 प्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच सर्व तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती कार्यालयामार्फत महिला, बालक, न्यायालयीन बंदी, अनुसूचित जाती व जमाती मधील लोक, औद्योगिक कामगार, आर्थिक दुर्बल घटक यांना मोफत विधीसहाय्य दिले जाते.

सन 2022 मध्ये एकूण 367 लोकांना जिल्हा प्राधिकरण व तालुका समिती मार्फत मोफत विधी सहाय्य पुरविण्यात आले आहे. यात 167 महिला, 107 न्यायालयीन बंदी, 38 बालक, 5 अनुसूचित जाती जमाती मधील लोक, 1 औद्योगिक कामगार, 13 कोविड – 19 मधील व्यथीत तसेच 36 आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांचा समावेश आहे, अशी माहिती विधीसेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमीत जोशी यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने