भद्रावती:- तालुक्यातील ढोरवासा केंद्राच्या केंद्रस्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे नुकतेच जिल्हा परिषद शाळा ढोरवासा येथे थाटात उद्घाटन झाले
केंद्रातील एकूण 11 शाळेने यात सहभागी नोंदविला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर क्षिरसागर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, उदघाटक मुनेश्वर बडकल तर प्रमुख पाहुणे म्हणून दोहतरे सर, वर्षाताई काळे, अरुणा वरखडे, सरोज इंगोले, सुनील जाधव, पुंजेकर सर, केशव आमने, माधव ठाकरे, देवराव खारकर, मानकर सर, विनोद मुन सर, मनीषा कामरे, लक्ष्मण शेडमाके, घुगल सर, कल्पना भगत उपस्थित होते.
सुरवातीला जिल्हा परिषद शाळा ढोरवासा च्या विद्यार्थ्यांनी लेझीम च्या सुरेख तालावर मान्यवरांना कार्यक्रम स्थळी आणले व दिप, माल्यार्पण व मशाल प्रज्वलीत करून कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाली.
मागील वर्ष्याच्या क्रीडा स्पर्धेत अव्वल असलेली जिल्हा परिषद चिरादेवी चा जगदीश आत्राम या विद्याथ्याने मशाल घेऊन क्रीडांगनाचा फेरा मारला.
पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर झालेच सोबत ढोरवासा शाळेच्या विद्यार्थिनींनी सुरेल असे स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले, सुरवातीला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराळा च्या चमुने सुंदर डान्स सादर करून बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या त्यानंतर जिल्हा परिषद शाळा तेलवासा ची आरोही नगराळे हिने सुंदर नृत्य सादर केले, जिल्हा परिषद शाळा कुनाडा यांनी कोळी गीत सादर करून सर्वांचे लक्ष वेधले, जिल्हा परिषद शाळा ढोरवासा येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळविला,
प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री गायकवाड सर यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या मैदानी व कलाकौशल्याला वाव मिळावा यासाठी यापेक्षा सुंदर योग दुसरा राहू शकत नाही. कोरोना मुळे दोन वर्षे थांबलेली स्पर्धा या वर्षी प्रथमच घेण्यात येत असल्यामुळे आनंद व्यक्त केला. शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी ही स्पर्धा फायद्याची ठरणार असे प्रतिपादन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री पुंजेकर सर यांनी अकरा शाळेचा भार असून सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केल्या बद्दल केंद्रप्रमुख श्री गायकवाड सर यांचे विशेष आभार मानले. दोहतरे सर यांनी सुरेख आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला व उत्साही गावकरी यांचे धन्यवाद मानले. उपसरपंच मुनेश्वर बदकल यांनी सर्व गावकऱ्यांनी आपला कार्यक्रम समजून सहयोग द्यावा अशी विनंती केली. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मीकांत धर्मपुरीवार सर यांनी तर आभार प्रदर्शन अजय गाडगे सर यांनी केले