शब्दांकूर फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी #chandrapur #gondpipari


शब्दांकूर फाऊंडेशनचा दुसरा वर्धापन दिन संपन्न

थोर पुरुषांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज:- प्रा.संतोष बांदुरकर


गोंडपीपरी:- शब्दांकूर फाऊंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन तसेच स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे धनोजे कुणबी समाज सभागृह,गोंडपीपरी येथे साजरी करण्यात आली.

याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.संतोष बांदुरकर सर जनता महाविद्यालय,गोंडपीपरी प्रमुख अतिथी म्हणून धर्मुजी धानोरकर मुख्याध्यापक, इंद्रपाल मडावी केंद्रप्रमुख,संजय वागदरकर,सुदर्शन भोगेकर,सुनील सातपुते मुख्याध्यापक,पाल सर, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दुशांत निमकर यांनी करतांना संस्था निर्मितीचे उद्दिष्टे व पुढील ध्येय यावर सविस्तर विवेचन केले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय वागदरकर, इंद्रपाल मडावी,धर्मुजी धानोरकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या भविष्यातील भरीव अशा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचा दुसरा वर्धापन दिन केक कापून आनंदात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संतोष बांदूरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून समाज परिवर्तनासाठी थोर पुरुषांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव राजेश्वर अम्मावार यांनी केले तर मान्यवरांचे आभार देवानंद रामगिरकर सचिव शब्दांकुर साहित्य मंच शाखा गोंडपीपरी यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर चलाख उपाध्यक्ष शब्दांकूर फाऊंडेशन, तानाजी अल्लीवार जिल्हा कार्याध्यक्ष शब्दांकुर साहित्य मंच,उज्ज्वल त्रिनगरीवार अध्यक्ष तालुका शाखा गोंडपीपरी सचिन दळवी सहसचिव,अरुण कुत्तरमारे प्रसिद्धी प्रमुख तसेच शब्दांकुर फाऊंडेशन व साहित्य मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत