Click Here...👇👇👇

भाच्याने मामाच्या डोक्यात घातलं फावडं त्यानंतर... #Chandrapur #Bhandara #murder

Bhairav Diwase

भंडारा:- परस्पर भांडणातून भाच्याने मामाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात घडलाय. हत्येनंतर आरोपीने काहीच झाले नाही असे दाखवले.

मात्र पोलिसांनी अधिक तपास करत आरोपी भाच्याचे बिंग फोडले आहे. दोघेही विटभट्टीवर मजूर म्हणून काम करत होते. परस्पर झालेल्या वादातून आरोपी भाच्याने मामाचा फावड्याने वार करुन हत्या केली आहे.

भंडाऱ्यातील कारधा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या अजीमाबाद येथे ही धक्कादायक घटना घडवी आहे. राजू मनहारे (33) असे मृत मामाचे नाव आहे. तर, सुनीलकुमार छत्तु गितलहरे (18) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. दोघेही मूळचे छत्तीसगढमधील बलोदाबाजार जिल्ह्यातील सलोनी येथील रहिवासी आहेत. दोघेही कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजिमाबाद गावात विटभट्टीवर कामाला होते. तन्नू पटेल यांची ही विटभट्टी होती. हे दोघेही भट्टी परिसरातच अन्य कामगारांसह एका झोपडीत राहत होते.

रविवारी भांडणानंतर सुनीलकुमारने मामा राजू मनहारे याची फावड्याने हत्या केली. त्यानंतर राजू मनहारे याचा मृतदेह विटभट्टीच्या खड्डात आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थाळी धाव घेतली. मात्र मृतेदह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये भाचा सुनीलकुमारने मामाच्या हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत सुनीलकुमारला अटक केली आहे. तसेच राजूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.