Top News

"ग्रामविकासाकरीता युवाशक्ती' या विषयावर सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर द्वारा विशेष शिबिराचे आयोजन #chandrapur




चंद्रपूर:- विद्यार्थ्यांच्या प्रगती सोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व विद्यार्थी सामाजिक, आर्थिक, शारीरिक व मानसिकरीत्या सक्षम व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय कार्याविषयी आवड निर्माण व्हावी, श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी आणि विद्यार्थी राष्ट्रप्रेम. आरोग्य जाणीव जागृती, परिवहनाचे नियम, सायबर सुरक्षा, स्वच्छता, मतदान याविषयी जागरूकता निर्माण करतील हा उद्देश समोर ठेऊन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दि. 27 जानेवारी 2023 ते दि. 02 फेब्रुवारी 2023 या दरम्यान मु. पो. विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे 'ग्रामविकासाकरीता युवाशक्ती' या विषयावर महाविद्यालयीन विशेष शिबिर आयोजित केले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा...

शनिवार, दि. 28 जानेवारी 2023

स्वयंसेवकांचे आगमन, उपस्थिती, नोंदणी आणि परिसर स्वच्छता


शनिवार, दि. 28 जानेवारी 2023

सायंकाळी 4.00 वाजता:- उद्घाटन समारंभ

अध्यक्ष:- श्रीमती सुधाताई पोटदुखे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर

उद्घाटक:- डॉ. श्याम खंडारे संचालक राष्ट्रीय सेवा योजना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

प्रमुख अतिथी:- सुदर्शन निमकर माजी आमदार तथा उपाध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, प्रशांत पोटदुख सचिव सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत सहसचिव सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, स्नेहल रहाटे तहसीलदार तहसील कार्यालय बल्लारपूर, उमेश पाटील पोलिस निरीक्षक, पोलीस स्टेशन बल्लारपूर

प्रमुख पाहुणे:- अनिरुद्ध वाळके संवर्ग विकास अधिकारी, बल्लारपूर, डॉ. दिलीप जयस्वाल प्राचार्य राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर, डॉ. संजय सिंग प्राचार्य शरद पवार महाविद्यालय गडचांदूर, डॉ. अविशा मडावी वैद्यकीय अधिकारी प्राथ. आरोग्य केंद्र विसापूर, डॉ. विजय गेडाम जिल्हा समन्वयक रासेयो गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, वर्षाताई कुळमेथे सरपंच ग्रामपंचायत विसापूर, अनेकश्वर मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर

रात्री. 7 वाजता:- सांस्कृतिक कार्यक्रम

रविवार दि. 29 जानेवारी 2023

सकाळी 8:00 ते 10:00 वाजता:- श्रम संंस्कारव्दारे बंधारा निर्माणकार्य

दुपारी 3:00 ते 4:00 वाजता:- विषय - रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम
वक्ते किरण मोरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर

दुपारी 4:00 ते 5:00 वाजता:- विषय सायबर सुरक्षा
वक्ते मुजावर अली - सायबर हाईजिन, प्रॅक्टीशनर, सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर

रात्री. 7:00 वाजता:- सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम

सोमवार दि. 30 जानेवारी 2023

सकाळी 8:00 ते 9:00 वाजता:- श्रम संंस्कारव्दारे बंधारा निर्माणकार्य

सकाळी 9:00 ते 2:00 वाजता:- विषय - आरोग्य तपासणी शिबिर (सिकलसेल, बी.पी, शुगर, कॅन्सर, महिलांच्या समस्या)
वक्ते:- डॉ. अविशा मडावी, वैद्यकीय अधिकारी प्राथ. आरोग्य केंद्र विसापूर

दुपारी 3:00 ते 4:00 वाजता:- विषय - जल संवर्धन
वक्ते:- संजय वैद्य जिल्हा समन्वयक जलबिरादरी चंद्रपूर

दुपारी 4:00 ते 5:00 वाजता:- विषय - मतदार जनजागृती व युवकांचा अधिकार
वक्ते:- डॉ. संजय गोरे शरद पवार महाविद्यालय गडचांदूर

रात्री. 7:00 वाजता:- सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम

मंगळवार, दि. 31 जानेवारी 2023

सकाळी 8:00 ते 10:00 वाजता:- मातोश्री वृद्धाश्रमाला भेट, फळवाटप आणि परिसर स्वच्छता

दुपारी 3:00 ते 4:00 वाजता:- विषय - रोजगार, स्वयंरोजगार, करिअर मार्गदर्शन
वक्ते:- शैलेश भगत कौशल्य विकास अधिकारी चंद्रपूर

दुपारी 5:00 ते 6:00 वाजता:- विषय - शासकीय योजनेची माहिती 
वक्ते:- राहुल ताकधत जिल्हा समन्वय अनुलोम संस्था चंद्रपूर 

रात्री. 7:00 वाजता:- सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम 

बुधवार, 01 फेब्रुवारी 2023

दुपारी 12:00 वाजता:- समारोपीय कार्यक्रम
अध्यक्ष:- डॉ. प्रमोद एस. काटकर प्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

प्रमुख अतिथी:- डॉ. सुभाष मेकाला प्राचार्य जनता महाविद्यालय चंद्रपूर, डॉ. सुनील साकुरे प्राचार्य एस. आर. एम. समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर, डॉ. जयेश चक्रवर्ती प्राचार्य एल. के. एम. आय. एम. एस. आर. कोसारा, डॉ. एजाज शेख प्रभारी प्राचार्य शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर, वर्षाताई कुळमेथे सरपंच ग्रामपंचायत विसापूर, अनेकश्वर मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर, डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार उपप्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर

गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023

सकाळी 8:00 ते 11:00 वाजता:- परीसर स्वच्छता
सकाळी 11:00 ते 12:00 वाजता:- भोजन
दुपारी 2:00 वाजता:- शिबिरार्थ्यांचे प्रस्थान 


आपले विनीत.....

डॉ. प्रमोद एस. काटकर प्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर
वर्षाताई कुळमेथे सरपंच ग्रामपंचायत विसापूर,
अनेकश्वर मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर,
तथा विसापूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यगण 

डॉ. कुलदीप गोंड कार्यक्रम अधिकारी रा. से. यो.
डॉ. उषा खंडाळे विभागीय समन्वयक रा. से. यो.
डॉ. पुरुषोत्तम माहोरे कार्यक्रम अधिकारी रा. से. यो
डॉ. वंदना खनके कार्यक्रम अधिकारी रा. से. यो.,
डॉ. निखील देशमुख कार्यक्रम अधिकारी रा. से. यो. डॉ. राजकुमार बिरादार कार्यक्रम अधिकारी रा. से. यो


शिबिराची दिनचर्या...

पहाटे 5:00 ते 6:00 वा:- जागर
सकाळी 6:00 ते 7:30 वा:- प्रार्थना, योगनृत्य व व्यायाम
सकाळी 7:30 ते 8:00 वा:- अल्पोपहार 
सकाळी 8:00 ते 12:00 वा:- श्रमसंस्कार
दुपारी 12.00 ते 1.00 वा:- आंघोळ 
दुपारी 1.00 ते 2.00 वा:- भोजन 
दुपारी 2:00 ते 300 वा:- विश्रांती/सांस्कृतिक कार्यक्रम तयारी
दुपारी 3:00 ते 5:00 वा:- बौद्धिक सत्र 
सायं. 5:00 ते 6:00 वा:- खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाची पूर्व तयारी
सायं. 6:00 ते 7:00 वा:- सामुहिक प्रार्थना
रात्री. 7.00 ते 9.00 वा:- सांस्कृतिक कार्यक्रम 
रात्री 9.00 ते 10.00 वा:- भोजन
रात्री 10:30 वा:- विश्रांती 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने