पत्रकार प्रमोद राऊत यांचा गुरुदेव सेवा मंडळांनी केला सत्कार #chandrapur #chimur


चिमूर:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव गावागावांत सुरू आहे. या गुरुदेव सेवा मंडळ खंडाळा यांच्या वतीने पत्रकार प्रमोद राऊत यांचा नुकताच सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

पत्रकार प्रमोद राऊत हे आपल्या दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून अनेक बातम्या प्रसिध्दीस देत असतात. या बातम्यांची दखल घेत गुरुदेव सेवा मंडळ खंडाळा यांनी दखल घेतली व त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले होते. त्यांना विशेष संदेश व भ्रमणध्वनी करून सूचना देऊन बोलाविले व आज गुरुदेव सेवा मंडळ खंडाळा तर्फे सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाचे सुभाष महाराज यांनी पत्रकार प्रमोद राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार प्रमोद राऊत यांनी सांगितले की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जी कोणती शिकवण दिली असेल ती म्हणजे मानवतेची शिकवण दिली त्यानुसार जर प्रत्येक माणसाचे राष्ट्रसंताचे विचार आत्मसात केले तर प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. आज राष्ट्रसंतांच्या विचारांची या जगाला गरज आहे. तसेच किशोर गुरले हे युवा प्रचारक असून राष्ट्रसंताचा प्रचार व प्रसार करीत असतात. आजच्या जगाला राष्ट्रसंतांची गरज आहे. त्यासाठी संताचा प्रचार व प्रसार आवश्यक आहे. असेही यावेळी प्रमोद राऊत यांनी गुरुदेव पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत