Top News

नारंडा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा #chandrapur #Korpana


कोरपना:- तालुक्यातील आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या सौजन्याने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना रस्त्यावरून गाडी चालवताना कश्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली व आपण शहरामध्ये व महामार्गावरील रस्ता ओलांडतांना कधी ओलांडावा याबद्दल सुधा माहिती दिली व आपण ही माहिती आपल्या पालकांना व गावातील सर्व नागरिकांना द्यावी असे आवाहन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला मंचावर जिचकार साहेब प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हायवे चंद्रपूर, नारगोडे साहेब GR infraproject director, पूनम कुमार साहेब legal manager GR infra projects, आशिष भाऊ ताजने भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रपूर, ज्येष्ठ शिक्षक श्री खामनकर सर, श्री पिंपळे शेंडे सर कु हूलके मॅडम, श्री फुलझले सर श्री दवंडे सर श्री दुमाने सर सौ साळवे मॅडम, सौ.निवलकर मॅडम, श्री वाबिटकर सर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रस्ते सडक सुरक्षा याबद्दल जनजागृती करून माहिती दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेमध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह विषयी स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधून उत्कृष्ट 5 विद्यार्थ्यांना कंपनीच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री परसुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक श्री मंगेश माडुरवार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने