दलित महिलेची जंगलात दगडाने ठेचून निर्घृण हत्या #chandrapur #Jivati


लहुजी ब्रिगेड या संघटने कडून ठाणेदारांना निवेदन


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील पल्लेझरी गावातील दलित महिलेवर पाळत ठेऊन असलेल्या युवकाने दलित महिलेची दगडाने ठेऊन खून केल्याची घटना 24/01/2023 ला दुपारी 3.30 वा. दरम्यान घडली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, सौंं. मीरा गुरुदेव शहारे नामक महिला आपली अपंग आई, बहीण यांच्यासोबत आपल्या नवऱ्याला घेऊन राहत होती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदर निर्वाह करत होती आणि तीच कुटुंबाच साभाळ करीत होती सदर महिला स्वयंपाकासाठी जळावू लाकडे आणण्यासाठी गावाशेजारील जंगलात गेली असता आरोपीनी मृत्य महिलेवर दगडाने आणि तीक्षण हत्याराने अनेक घाव करून तिची निर्घृण हत्या केली असल्यानेच सध्या आरोपीवर कलम 302 आणि ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दखल झाला आहे.

सदर प्रकरणाचा तपास पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री शरद आवारी साहेब हे करीत असून सदर प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून श्री नायक साहेब sdpo गडचांदूर हे करीत आहेत.सदर प्रकरणाची माहिती मिळताच लहुजी ब्रिगेड चे अध्यक्ष डॉ अंकुश गोतावळे यांनी घटनास्थळाला आणि पीडिताच्या कुटुंबियांना भेटून सर्व आपबीतीजाणून घेतले आणि लगेचच पोलीस उपनिरीक्षक श्री आवारी साहेब यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन प्रकरणाचा तपास योग्य रीतीने करण्याचे संगितले प्रकरणातील तपासात काही दोष आढळून आल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जवळपास 3 तास प्रेत हा गावाच्या चौकात ठेवण्यात आले होते त्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रकरणाचा तपास योग्य रीतीने करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच प्रेताचा अंत्यविधी करण्यात आला या वेळी गावातील आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते व लहुजी ब्रिगेड चे संयोजक प्रा. सुग्रीव गोतावळे श्री दत्ता गायकवाड श्री गणेश वाघमारे श्री बालाजी कांबळे श्री अंबादास गोतावळे श्री. मछिंद्र मोरे श्री रमेश भालेराव श्री. तानाजी कांबळे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत