Top News

राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे हस्ते होणार उद्घाटन #chandrapur

जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची उपस्थिती


चंद्रपूर:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यस्मरण महोत्सवा निमित्य व लोकसेवक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 26, 27 व 28 जानेवारीला दु 12 वाजता भव्य राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन नेहरू नगर जागर पार्क, माता मंदिर समोर, मुल रोड चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

या समारंभाचे उद्घाटन ना. सुधीर मुनगंटीवार (मंत्री - वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री - चंद्रपूर) यांचे हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुबोध दादा( संचालक- भुवैकुंठ अड्याळ टेकडी)यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनय गौडा (जिल्हाधिकारी, चंद्रपूर),रविंद्रसिंह परदेशी (पोलीस अधिक्षक, चंद्रपूर), विजयबाबू चोरडीया(भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य),डॉ. मंगेश गुलवाडे(अध्यक्ष भाजपा महानगर चंद्रपूर), डॉ. वासुदेव गाडेगोणे(अस्थिरोग तज्ञ), बंडोपंत बोडेकर(ग्रामगिता चार्य, केंद्रीय सदस्य, गुरुकुंज),प्रकाश धारणे, (कोषाध्यक्ष भाजपा महानगर, चंद्रपूर),अजय वैरागडे(कोषाध्यक्ष चांदा जिल्हा संताजी शि. प्रसारक मंडळ, चंद्रपूर ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले(महामंत्री भाजपा महानगर,चंद्रपूर व विशाल निंबाळकर(अध्यक्ष भाजपा युवा आघाडी, चंद्रपूर)यांची उपस्थिती राहणार आहे.

सर्व बंधू भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष विजय चिताडे,कार्याध्यक्ष इंजि.सुभाष कासंगोट्टुवार,उपाध्यक्ष विजय पोहनकर,सचिव पुरुषोत्तम सहारे,सहसचिव लक्ष्मण सावरकर व कोषाध्यक्ष उमेश आष्टणकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने