भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील माजरी येथे वाघिणीचा मृत्यू झाल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. रविवार, १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या मुख्य लाईनजवळील सी केबिनच्या मागील भागात वाघिणीचा मृतदेह आढळून आला.
वाघीण मृतावस्थेत दिसताच याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी पुढे पाठविला असून अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल.