11 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
नागपूर:- नागपुरात नायलॉन मांजाने गळा कापल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपुरच्या जरीपटका परिसरात महात्मा गांधी शाळेतून शनिवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 11 वर्षीय मुलगा वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी परतत होता. त्यावेळी मांज्यामुळे त्याचा गळा चिरला गेला. यानंतर उपचारासाठी मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्राव झाला होता. दरम्यान, रविवारी उपचारादरम्यान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
✅
✅
✅