चंद्रपूर महानगरपालिका येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी सहायक आयुक्त विद्या पाटील, विकास दानव, प्रदीप पाटील, अनिल बनकर,प्रमोद नवले, संघमित्रा पुणेकर,संजय चौधरी, महेश नन्हेट, बहादूर जगनाडे, दिलीप नंदवंशी, सुनील नामेवार उपस्थीत होते.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज सोमवार ( दि. २३ जानेवारी ) रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच इतर अधिकारी कर्मचारी यांनीही प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

प्रखर देशाभिमान व उत्तम संघटन कौशल्य असलेले स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांचे प्रभावी नेतृत्व युवा पिढीमध्ये संघटनात्मक बांधिलकी राहावी या दृष्टीने सतत कार्यरत राहत असुन त्यांचे कार्य सदैव समरणात राहील असे प्रतिपादन सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी यावेळी केले.