Top News

भाजपा महिला आघाडी चंद्रपूरची जिल्हा बैठक तथा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न chandrapur
चंद्रपूर:- भाजपा महिला आघाडी चंद्रपूरची जिल्हा बैठक तथा हळदी कुंकू कार्यक्रम श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमला सौ. वनिताताई कानडे उपाध्यक्ष प्रदेश, गोंदिया वरून आलेल्या शुभांगी मेंढे आणि शालिनी डोंगरे, रेणुका दुधे सदस्य प्रदेश, अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष, किरण बुटले आत्मनिर्भर जिल्हा अध्यक्ष, विजयालक्ष्मी डोहे महामंत्री, सैयरा शेख महामंत्री, रत्नमाला भोयेर ओ बी सी महिला मोर्चा अध्यक्ष, बंदना सिन्हा महिला मोर्चा उत्तर भारतीय जिल्हा अध्यक्ष, शोभाताई पिदूरकर आणि भाजपा महिला आघाडीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महिलांना जास्तीत जास्त सोशल मीडियाशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच हळदी कुंकू देऊन "तिळगुळ घ्या गोड गोड बोला" अश्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमचे प्रास्ताविक विजयालक्ष्मी डोहे यांनी केले. तर संचालन लक्ष्मी सागर, आभार विद्या देवाळकर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने