वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
चंद्रपूर:- चंद्रपूर बेलदार समाज विकासाच्या बाबतीत आपली रेष मोठी करून वाटचाल करणारा समाज आहे. बेलदार समाज उपजातींची बंधने तोडत एक छत्राखाली येतोय ही आनंदाची बाब आहे . केंद्राच्या यादीत बेलदार उपजातींबाबत अद्यापही उल्लेख नाही. त्यामुळे उपजातींचा विषय घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’, अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विदर्भ बेलदार समाजाच्यावतीने आयोजित १९ व्या राज्यस्तरीय बेलदार समाज उपवर वधू मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाला बेलदार समाजाचे प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर कोट्टेवार, प्रांतीय कार्याध्यक्ष आनंद अंगलवार, प्रांतीय सचिव रवींद्र बंडीवार, प्रांतीय उपाध्यक्ष राजेश कात्रटवार, कन्नमवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, जिल्हा अध्यक्ष आनंद कार्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष सूरज पेदुलवार,अभिजीत पुरम , विनोद येडलावार , शहर अध्यक्ष सचिन चलकलवार, प्रभाताई चिलके, प्रीती तोटावार, अरविंद गांगुलवार, आरती अंकलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल आकुलवार , विशाल बत्तुलवार, अभिजीत पुरमशेट्टीवार, पवन कन्नमवार , सुनिल मिलाल , निलेश मच्चावार , सौरभ चिलके , मोहीत बाचीकवार , बादल गार्लावार , भूषण चिलके इत्यादींने परिश्रम घेतले.