Top News

शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ललित बहादे ४ जानेवारी ला चंद्रपुरात #chandrapur
चंद्रपूर:- आगामी निवडणुका लक्ष्यात घेता, तसेच सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन व शेतकरी संघटनेचे भविष्यात होणाऱ्या आंदोलन, निवडणुका, शेतकरी संघटनेची बांधणी या अनुषंघाने शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ललित बहादे यांचा विदर्भ दौरा सुरू असून ४ जानेवारी ला चंद्रपूर जिल्हा दौरा वर येत आहे.

त्या करिता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना चे सर्व पदाधिकारी,नेते, व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक ४ जानेवारी ला चंद्रपूर येथील विश्रमगृह ( वरोरा नाका) येथे ठीक १२.०० वाजता विश्रामगृह येथे आयोजित केली आहे तरी सर्व शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार वामनराव चटप साहेब, जिल्हा प्रमुख,नीलकंठ पाटील कोरंगे,जिल्हा प्रमुख अरुण पाटील नवले महिला जिल्हा प्रमुख जोत्सना मोहित्कर ,युवा आघाडी जिल्हा प्रमुख ॲड.श्रीनिवास मुसळे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने