Top News

चंद्रपूर महानगरात चित्रकला स्पर्धा व परिक्षेवर चर्चा कार्यक्रमाचे आयोजन #chandrapur



चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरात चित्रकला स्पर्धा व परिक्षेवर चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धा दि. २४ जानेवारीला शाळा व महाविद्यालय येथे घेण्यात येणार आहे. तर परिक्षेवर चर्चा दि. २७ जानेवारीला सकाळी ११.०० वा. प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमाची जबाबदारी लोकसभा संयोजकाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे तर विधानसभेची डॉ. मंगेश गुलवाडे यांच्याकडे देण्यात आली आहे. चित्रकला स्पर्धा व परिक्षेवर चर्चा कार्यक्रमाला जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकसभा आणि विधानसभा संयोजकांनी केले आहे.



चित्रकला स्पर्धेचे बक्षिस मंडळ निहाय

प्रथम बक्षिस रु.५०००/-

द्वितीय बक्षिस रु.३०००/-

तृतीय पारितोषिक रु. २०००/-

प्रोत्साहन १० बक्षिस.

चित्रकला स्पर्धेत प्रत्येक शाळेतील १० विजयी स्पर्धक घेण्यात येणार.

सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

वर्ग ८ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थी भाग घेऊ शकतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर आपली नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे.



चित्रकला स्पर्धेचे विषय

१. आत्मनिर्भर भारत

२. कोरोना लसीकरणामध्ये भारत नं. १

3. स्वच्छ भारत अभियान

४. आंतरराष्ट्रीय योगदिन-मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष

५. सर्जिकल स्ट्राईक

6. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

७. पंतप्रधानाच्या जनसेवेच्या विविध योजना

८. बेटी बचाव बेटी पढाव

९. जी-२० जागतिक विश्वगुरु बनण्याचा दृष्टीने भारताची वाटचाल

१०. चुलीतल्या धुराच्या त्रासापासुन मुक्त महिला-मोदीजींचा संवेदनशिल निर्णय


अधिक माहिती साठी संपर्क साधावा....

डॉ. मंगेश गुलवडे 9822565130

राजेंद्र गांधी 9405523555

ब्रिजभूषण पाझारे 9850887744

विशाल निंबाळकर 9665802271

सुभाष कासनगोट्टूवार 9422835868

रवी गुरनुले 8408066883

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने