Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

व्हाट्सॲप स्टेटसवर I Am Sorry ठेवून खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाची आत्महत्या #chandrapurबीड:- खाजगी शिकवणी घेणाऱ्या तरुण शिक्षकाने व्हाट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपवर 'आय एम सॉरी' ( I Am Sorry) असे स्टेटस (Status) ठेवून आत्महत्या ( Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या (Ambajogai) घाटनंदुर गावात ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणारा हा तरुण शिक्षक घाटनांदुर गावातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य देखील होता. नितेश कोकणे असं त्याचं नाव आहे

नितेश कोकणे यांनी व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नितेश कोकणे हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य असून खाजगी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे. त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर उच्चशिक्षित असलेल्या नितेश कोकणे यांनी आत्महत्या का केली याचा तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत