Top News

१९ लाखांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक #theft #arrested #chandrapur

आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

चंद्रपूर:- दि. 16/03/2022 रोजी फिर्यादी नामे दिनेश प्रकाश चलाख वय 33 वर्ष रा. सिंतळा मुल व त्यांचा मित्र अक्षय विलास गोवर्धन चय 27 वर्षे रा. शिवाजी नगर वार्ड क्र. 17 मुल जि. चंद्रपूर हे दोघे त्यांचे मालक दिनेश गोयल यांचे महालक्ष्मी ट्रेडींग कंपनीची विवीध ठिकाणावरून वसुली करून परत येत असतांना अंदाजे 20:45 वा ते 21:00 वा. दरम्यान चंद्रपूर मुल रोडवरील जानाळा ते डोणी फाट्याजवळ मागूण येणाऱ्या मोपेड मोटार सायकल वरील दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचे गाडीचे हॅन्डल पकडून खाली पाडून त्यांना मारहाण करून त्याचे जवळील 18,93,520/- रू. ची नगदी रोकडची बॅग जबरीने हिसकावून घेवून गेले. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो. स्टे.मुल अप.क्र. 154/2022 कलम 394 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये बाळासाहेब खाडे पो.नि. स्था.गु.शा. यांचेकडे देण्यात आला. दि. 20/01/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनिय माहिती मिळाली की, मुल येथील 1) केतन अशोक बुटले वय 23 वर्षे 2) तौहीद आरीफ शेख वय 24 वर्षे दोन्ही रा. वार्ड नं. 17 ताडाळा रोड मुल जि.चंद्रपूर यांनी सदरचा गुन्हा केला आहे. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो. हवा. नितीन साळवे / 254, प्रकाश बल्की / 618 प्रमोद बारे / 779, ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार / 814. पो. कॉ. सतिश बगमारे / 1352 यांचे पथक गठीत करून नमुद आरोपीतांवर गोपनिय पाळत ठेवली असता ते मिळून आले. त्यांना गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपीने चोरीचे रोकडमधुन खरेदी केलेले 4,00,000/- रु. एक लाल रंगाची वरणा चारचाकी वाहन जुनी वापरती वाहन क्र.एम.एच.40 एसि 6354,   2.25,000/- रु. एक जुनी वापरती खाकी रंगाची बुलेट मोटार सायकल क्र. एम. एच. 34 बिएस 8333 तसेच गुन्हयात वापरलेले वाहन 1,00,000/- रू एक जुनी लाल रंगाची मारोती 800 चारचाकी वाहन क्र. एम.एच 31 झेड 3789 मालमत्ता आरोपीतांकडून हस्तगत करण्यात आली. आरोपींचा पि.सि.आर. घेवून उर्वरीत मालमत्ता हस्तगत करण्यात येत आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो. हवा. नितीन साळवे / 254 प्रकाश बल्की / 618 प्रमोद डबारे / 779, ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार / 814. पो.कॉ. सतिश बगमारे / 1352 यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास बाळासाहेब खाडे, पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.

डी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने