विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन #chandrapurचंद्रपूर:- विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

 चंद्रपूर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. वरोरा-भद्रावती विधानसभेचे दोन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 

82 व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. निधनाची वार्ता कळताच राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत