अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात?
राजुरा:- आज पहाटेला एका महामंडळ बस खामोना जवळ बस चे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. बस क्रमांक MH-07 -C- 9081 गाडेगाव-विरुर-राजुरा ही बस रात्री अंतरगाव येथे हाल्टींग असते. आज पहाटेला ही बस राजुरा कडे निघाली असता खामोना येथे बसचा अपघत झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही, परंतु बसचे नुकसान झाले आहे.
बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते. वाहक चालक सुनील गोपाजी साव यांच्याशी संवाद साधला असता ही गाडी अगोदर पासूनच रस्त्यावर चालवण्यायोग्य नव्हती, तरीसुद्धा डेपो मॅनेजरने ही बस लाईन वरती पाठवली होती. या गाडीला हॉर्न सुद्धा नव्हता, ड्रायव्हर चालक सुनील साव यांच्या प्रसंगावधानामुळे व समय सूचकतेमुळे गाडीचा मोठा अपघात होता होता टळला.
महामंडळाच्या दुसऱ्या चालकाशी संवाद साधला असता त्यांच्या म्हणण्यानुसार ही गाडी एक महिन्यापासूनच स्क्रॅपमध्ये गेलेली होती, तरीसुद्धा एसटी महामंडळ अशा स्क्रॅप मध्ये गेलेल्या गाड्यांना का रस्त्यावर परवानगी देते हा विचार करणायोग्य मुद्दा आहे.
सदर गाडीचे ब्रेक सुद्धा फेल होते. अनेक वाहक चालकांशी संवाद साधला असता त्यांचे असे म्हणणे होते अशा कित्येक गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात आहे. तरीसुद्धा डेपो मॅनेजर अशा गाड्यांना रस्त्यावर चालवण्याची परवानगी का देते? हजारो सर्वसामान्य नागरिक अशा गाड्यांमधून दररोज प्रवास करीत असतात कारण त्यांचा महामंडळाच्या गाड्यांवरती विश्वास आहे म्हणूनच, पण अशा ब्रेक फेल झालेल्या गाड्या, हॉर्न नसलेल्या गाड्या, डेपो मॅनेजर चालवण्याची परवानगी देऊन प्रवाशांचे जीव धोक्यात घालत आहेत.
अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या अधिकाऱ्याला कोणी दिला. एखादी गाडी स्क्रॅप मध्ये गेलेली असताना सुद्धा अशा गाड्यांना महामंडळ चालवण्याची परवानगी का देते? हा मुद्दा विचार करण्या योग्य आहे. एसटी महामंडळ प्रबंधक सुतवणे मॅडम यांनी अशा नादुरुस्त गाड्यांना दुरुस्त करूनच रस्त्यांवर परवानगी द्यायला हवी अशी सर्वसामान्य नागरिकांनी अशा वेळेस अपेक्षा व्यक्त केल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत