Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चोरडिया कॉटन इंडस्ट्रीस कापसाच्या जिनिंगला आग #chandrapur #wardha #fire #firenews


वर्धा:- समुद्रपूर तालुक्यातील जाम ते वरोरा मार्गवरील गणेशपुर नंदोरी एथिओ चोरडिया कॉटन इंडस्ट्रीसमध्ये काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक कापसाच्या गंजीतून धूराचे लोळ दिसताच आग विझविण्यासाठी धावपळ सुरू झाली, बघता बघता कापसाने भरलेले वाहनातील कापसाला आग लागली.

जिनिंग मध्ये आग लागल्याची माहिती मिळताच हिंगणघाट नगरपरिषदची अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले.सध्या आग विझवण्याचे कार्य सुरू आहे.जिनिंग मध्ये आतापर्यंत खरेदी केलेला कापूस जळल्याचे सांगण्यात आले.अंदाजे पंधराशे ते दोन हजार क्विंटल कापूस जळल्याचे जिनिंग मालक सोहेल यांच्याकडून सांगण्यात आले. या आगीत अनुचित घटना घडली नसली तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा प्रयत्न अग्निशमन दलाकडून गेला. आगीवर नियंत्रण आणले आहे. या घटनेची चौकशी समुद्रपूर पोलीस करीत आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्टता!

जिनिंग मध्ये लागलेल्या आगीचे कारण आद्यपही कळू शकले नसून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहे. जिनिंग मालकाकडून ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आगीत एक कोटीचे नुकसान!

चोरडिया कॉटन जिनिंगला आज दुपारच्या सुमारास आग लागली या आगीत पंधराशे ते दोन हजार क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून एक कोटी च नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत