चंद्रपूर:- महाकाली वार्ड, महाकाली मंदिर दसरा मैदान परिसरात एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 65 वर्षे असून मृत अवस्थेत आढळून आला आहे. मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर, शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे. सदर अनोळखी मृत पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही.
सदर व्यक्तीचे वय अंदाजे 65 वर्षे असून मध्यम बांधा, उंची 5 फूट 5 इंच, रंग गहू वर्ण, केस पांढरे, चेहरा गोल, डोळे बारीक, अंगात काळया रंगाचा जॅकेट, त्याखाली फुल बाह्याचा पांढरा शर्ट, काळ्या रंगाचा फुलपॅन्ट, गळ्यात पांढऱ्या रंगाचा दुपट्टा परिधान केलेला आहे. डाव्या पायावर सुजन आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.