चंद्रपूर:- संजय चिंतामण सागरे रा. आयटा वार्ड, पडोली यांच्या तोंडी रिपोर्टवरुन त्यांचे वडिल चिंतामण नंदोली सागरे वय 62 वर्ष रा. आयटा वार्ड, पडोली हे दि. 1 जानेवारी 2023 रोजी कोणालाही न सांगता घरून निघून गेले. त्यांच्या नातेवाईकाकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन विचारपूस केली असता आढळून आले नाही.
हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे:
सदर व्यक्तीचे वय 62 वर्ष, उंची 5 फूट, रंग सावळा, अंगात कथ्थ्या रंगाचे फुलशर्ट, फुलपॅन्ट घातलेला आहे. सदर वर्णनाची व्यक्ती परिसरात आढळून आल्यास हरवलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन, पडोलीच्या वतीने करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत