तुकूम परिसरात घरफोडी, 12 तोळे सोन्याचा ऐवज लंपास #chandrapur

Bhairav Diwase



चंद्रपूर:- चंद्रपुरातील एका लग्न समारंभातून ३५ तोळे सोने चोरुन नेण्याची घटना ताजी असतानाच घरातून १२ तोळे सोने लंपास करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.

घटना तुकूम परिसरातील अतुल महाडोळे यांच्या घरी घडली. महाडोळे हिंगणघाट येथे परिवारासह गेले होते. घरी परत आल्यानंतर त्यांना समोरच्या दरवाज्याचे कुलूप तुटून दिसले. आत प्रवेश केला तेव्हा कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. याच कपाटात १२ तोळे सोने आणि तीस हजार रुपये होते. ते चोरट्यांनी लंपास केले.

या प्रकाराची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केली. अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.