Top News

सु. बे. अभियंतांना जिल्हा परिषद यापुढे देणार 75 लाखांची नोंदणी



चंद्रपूर:- अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नोंदणी वाढीसाठी गेली पाच वर्ष सातत्याने महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन वाढीसाठी प्रयत्नशील होती  मंत्रालयामध्ये ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांची यावरती भेट घेऊन पूर्वीच्या तीस लाख रुपये नोंदणी ऐवजी थेट 75 लक्ष रुपये नोंदणीसाठी मंत्री महोदयांनी ग्रामविकास खात्याला आदेश दिले असून आठवडाभरात याबाबतचा शासकीय आदेश काढण्याचा आदेश मंत्री महोदयांनी दिला आहे . हा निर्णय अनेक वर्ष प्रलंबित होता.

 2006 साली झालेल्या शिर्डी येथील महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन च अधिवेशनात तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये बेरोजगार अभियंत्यांना नोंदणी पत्रासह रू 30 लक्ष किमतीची कामे विनानिविदा देण्याचा निर्णय सर्वप्रथम घेतला होता. त्यानंतर पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना त्यांना अनेकदा या नोंदणी मर्यादा वाढीसाठी निवेदन देण्यात आले होते व वेळोवेळी सचिव स्तरावर देखील मंत्रालयात बैठका झाल्या होत्या. सततच्या पाठपुराव्याला या वेळी यश मिळाले व सर्वांनी सकारात्मक अहवाल सादर केला होता.

सध्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या निवासस्थानी मंत्रालयात सुद्धा संघटनेच्या शिष्ट मंडळांनी भेट घेऊन वारंवार सदर जीआर काढण्याचा आग्रह धरला होता. अखेर यावरती सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश मंत्री महोदयांनी ग्रामविकास खात्याला दिले आहेत याबाबद महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच त्यासाठी इतरही काही स्थानिक जिल्हा संघटनांनी प्रयत्न केले  त्यामुळे आठ दिवसाच्या आत सदर शासकीय आदेश जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदांना लागू होणार आहे.
   महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन च्या 2006 साली शिर्डी अधिवेशनापासून सुरुवात झालेल्या या निर्णयात अद्यापपर्यंत वाढ नव्हती. म्हणून अनेक बेरोजगार अभियंत्यांची नोंदणी कालबाह्य झाली होती. त्यांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.
    मा. ना. गिरीश जी महाजन यांचे या निर्णयाबाबत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इंजि. संजय शिंदे, सर्वश्री इंजि. योगेश कासार पाटील, इंजि. मनोज माडगूळकर, ज्ञानेश्वर(ओम )मुकादम, निसर्ग राज सोनवणे,सागर बाविस्कर,अनंत मुळे, राविदर्शन कऱ्हाड,प्रदीप चौधरी, विनायक माळेकर, इत्यादी अभियंत्यांनी आभार व्यक्त केले आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने