मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्ताने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात फळ व गरोदर मातांना बेबी कीटचे वाटपपोंभूर्णा:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व गरोदर मातांना बेबी कीटचे वाटप करण्यात आले. 
पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांचे आदेशानूसार सहसंपर्क प्रमुख बंडूभाऊ हजारे चंद्रपूर यांचे सुचनेनुसार व  जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या कुशल नेतृत्वात दि ९ फेब्रुवारीला पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय रूग्णांना फळ वाटप व गरोदर मातांना बेबी कीटचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी रूग्णांची विचारपूस करुन अडचणी जाणून घेतल्या आणी जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्याशी संपर्क करून रूग्णांच्या समस्या  दूर करण्याचे आश्वासन यांनी दिले.

या प्रसंगी युवासेना नेते सुनिल कावटवार,उप तालुका प्रमुख शुभम वासेकर,मंगेश राऊत,रवि उमक,भास्कर राऊत,संकेत मडावी,जितेश गोंगले,संजू मंडवगडे,भुपेंद्र नैताम,अजित कोडापे, शसुमीत धोडरे,अमोल नैताम,संतोष कोसरे,राजू कोसरे, आशिष निमसरकार, महिला आघाडीच्या सविता कावटवार, वर्षा कावटवार,किशोर जुमनके, कांता राऊत, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत