अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी #chandrapur #mul



मुल:- शेतावर रब्बी पीक काढण्याकरीता गेलेल्या एक महिलेवर शेतात दडून असलेल्या अस्वलाने प्राणघातक हल्ला केला. यात ही महिला गंभीर जखमी झाली. ही घटना आज (दि.१३) घडली. देवकाबाई पत्रु झरकर असे जखमी महिलेचे नाव आहे. ती मोरवाही येथील रहिवासी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूल तालुक्यातील मोरवाही येथे राहणारी देवकाबाई आज सकाळी शेतात लाखोरी खदण्याकरीता गेली होती. दुपारच्या सुमारास काम करीत असताना अस्वलाने त्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला. महिलेने आरडाओरड केल्याने अस्वल पळून गेले. त्यामुळे महिला बचावली.

या घटनेची माहिती कुटुंबियांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या परिसरात आतापर्यंत वाघांचा धुमाकूळ सुरू होता, परंतु, आता अस्वलाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघांचा आणि आता अस्वलाचाही बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत