चिमुकलीने मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातली आणि..... #Chandrapur #nagpurनागपूर:- मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सक्करदरा परीसरात उघडकीस आली. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत मुलीचे नाव आहे.


दिनेश चौधरी यांचे औषधालय असून त्यावरील मजल्यावर कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुली आहेत. रिद्धी ही लहान मुलगी असून ती रविवारी दुपारी साडेबारा वाजता बेडरुममध्ये खेळत होती. तिच्या हाती मच्छर मारण्याच्या औषधीची बाटली लागली. तिने तोंडात घातल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तासाभराने तिची आई बेडरुममध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्या वडिलांनी रिद्धीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तासांनंतर मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या