लग्न सोहळ्यातून 34 तोळ्यांचे दागिने लंपास #chandrapur #theft

Bhairav Diwase

चंद्रपूर:- लग्न सोहळ्यातून 34 तोळे सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झाला आहे.

शहरातील नागपूर रोडवरील शकुंतला लॉन मधील घटना असून रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची दखल तात्काळ घेत घटनास्थळी पोहचून सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात त्यांना काही संशयित आढळून आले आहेत. त्यांचा शोध सुरू असून लवकरच चोरट्यांनी बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांनी व्यक्त केला आहे.