Click Here...👇👇👇

पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी #chandrapur #Nagpur

Bhairav Diwase


नागपूर:- पोलीस पाठलाग करीत असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुर शहरात ही घटना घडली असून इम्रान शेख असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

याबाबत नागपूरच्या झोन पाचचे पोलीस उपायुक्त श्रावण दत्ता यांनी दिलेल्या माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातला देवलापार मध्ये इमरान शेख नावाच्या व्यक्तीचा ग्रामीण पोलीस शोध घेत होते. गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये जनावरांची तस्करी करण्याच्या प्रकरणात इम्रान शेख वरती देवलापार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचवेळी इम्रान हा नागपूरच्या कपिल नगर परिसरातल्या म्हाडा क्वार्टर मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावरती पोलीस रविवारी म्हाडा क्वार्टर्स मध्ये पोहोचले. पण पोलीस आल्याचे दिसताच इम्रान शेख यांनी तिसऱ्या मजल्यावर उडी घेतली.

या घटनेत इम्रान गंभीर जखमी झाला होता. ज्यामुळे त्याला नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात इम्रान शेख यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईमुळे इम्रान मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. इम्रानच्या नातेवाईकांच्या आरोपाची चौकशी केली जाईल असे नागपूर पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.