विदर्भ युवोत्सवात सरदार पटेल महाविद्यालय अव्वल #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- युवक बिरादरी भारत व रेनॉन्सेन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विदर्भ युवोत्सव २०२३ अंतर्गत विविध स्पर्धा झाल्या. यातील चित्रकला, रंगोली, तालवाद्य, समूह गान, टॅलेंट परेड व वादन संगीत अशा विविध स्पर्धामध्ये सरदार पटेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरस्कार पटकावून अव्वल स्थान मिळविले.

चित्रकला स्पर्धेत शुभम अधिकारी, रंगोली स्पर्धेत आकाश मडावी हा विद्यार्थी प्रथम, वादन संगीत जयकुमार रंगारी द्वितीय, समूहगान स्पर्धेत साहिल, वैभवी, मोनिका, जयकुमार, शंतनू, गायत्री, प्रणाली, अनिकेत, अजय, स्मृती, समीक्षा यांचा प्रथम क्रमांक आला. यशासाठी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अजय बेले आदींनी मार्गदर्शन केले.