चंद्रपूर जिल्ह्यातील बनावटी दारूच्या कारखान्यांवर धाड chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपुर:- बनावट देशी दारु निर्माती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकत चंद्रपुर तालुक्यातील चक बोर्डा येथील शेतशिवारात असलेल्या बनावटी नकली दारूचा कारखाना उध्वस्त केला. यात एकाला अटक करून 1,53,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रपुर तालुक्यातील मौजा वलनी-चकनिंबाळा रोडवरील चक बोर्डा गावात बनावट देशी दारु निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यावरून दिनांक 17 फेब्रुवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चक बोर्डा गावाच्या हद्दीत असलेल्या ललिता कांबळे यांच्या नावे असलेल्या शेतातील घरामध्ये छापा टाकला असता बनावटी देशी दारू निर्मितीचा कारखाना आढळला. यात घटनास्थळी शशिम कांबळे आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे तर घटनास्थळी कंप सिलींग मशीन, स्टॅम्प, प्रिंटींग मशीन, देशी दारुच्या सिलबंद २४० बॉटल, १०,५०० बुच, देशी दारुच्या बॉटलवर लावायची बुचे (प्रिन्ट असलेली), देशी दारुच्या बॉटलवर लावायची बुचे (प्रिन्ट नसलेली) १५०० बुचे ०१ बॉटल, प्रिन्टसाठी वापरात असलेली इंक बॉटल, थिनर, टेपपट्टी, कॅन, प्लॅस्टीक कॅन, खरड्याचे पुढे हायड्रोमीटर (दारु मिश्रणाची तीव्रता मोजण्यासाठी), देशी दारूच्या रिकाम्या १ ३०० बॉटल, रेफ्रीजरेटर, सुझुकी कंपनीची ओमनी चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण 1,53,300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शशिम प्रेमानंद कांबळे याला अटक करून मुंबई दारुबंदी कायदा १९४९ व भा.दं.वि. सहिता चे कलम ३२८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर कारवाई डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनिल चव्हाण संचालक (अंव द.) महाराष्ट्र राज्य मुंबई अनिल चासकर, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपुर विभाग नागपुर, संजय पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली ईश्वर एन. वाघ निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपुर, अमित क्षिरसागर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपुर, अभीजीत लिचडे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर शहर, संदीप राउत, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुल, तसेच जवान सर्वश्री चंदन भगत, अजय खताळ, किशोर पेदुजवार, जगदीश कापटे चेतन अवचट, प्रविकांत निमगडे, अमोल भोयर, जगन पडुलवार, संदीप राठोड यांनी पार पाडली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास अमित क्षिरसागर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चंद्रपुर हे करीत आहेत.