Top News

केंद्रात व राज्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतल्याने महिलांच्या पंखांना बळ मिळाले:- सुरेखा लुंगारे #chandrapur



चंद्रपूर:- भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी हेडगेवार सभागृह मुल येथे भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी बैठक चंद्रपूर ग्रामीण समन्वयक तथा भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ सुरेखाताई लुंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.



या बैठकीला संध्या गुरनुले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, अल्का अत्राम जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, रेणुकाताई दुधे प्रदेश सदस्य,प्राध्यापक रत्नमालाताई भोयर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष, वंदनाताई आगरकाटे महामंत्री, सायरा शेख महामंत्री, अर्चना जीव तोडे कोषाध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर ,वंदना सिन्हा उत्तर भारतीय महिला आघाडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र संपन्न झाले.



भारत मातेच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून बैठकीला सुरुवात झाली. प्रथम चंद्रपूर ग्रामीण समन्वयक व भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ सुरेखाताई लुंगारे यांचा अलकाताई अत्राम प्राध्यापक भोयर ताई व दुधेताई यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पुस्तक व एक सुंदर बॅग देऊन सत्कार केला. याच प्रसंगी संध्याताई गुरनुले यांची माळी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुकती झाल्याने त्यांचा सत्कार सुरेखाताईं व अलकाताई यांनी शाल श्रीफळ देऊन केला. याप्रसंगी बोलताना सुरेखाताई म्हणाल्या मोदी सरकारच्या काळात नारीला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे . केंद्रात व राज्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याने महिलांच्या पंखाला बळ मिळाले आहे. शौचालय योजना असो, उज्वला गॅस योजना असो, मुद्रा लोन असो, पंतप्रधान मातृ वंदना योजना असो ,सुकन्या समृद्धी योजना असो, बेटी बचाव बेटी पढाव अभियान असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, उमेद अभियान असो, माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजना असो, महिला सुरक्षा असो या सर्व योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा दिशेने निर्धाराने पावली टाकले जात आहेत. हे सांगत असतानाच ताई पुढे म्हणाल्या आगामी काळामध्ये आपल्याला धन्यवाद मोदीजी ,फ्रेंड्स ऑफ बीजेपी, युवा वॉरियर, नव मतदार नोंदणी, फेसबुक ट्विटर ओपन करायचे आहे व्हाट्सअप चे ग्रुप तयार करायचे आहे या बरोबरच प्रवास आणि संवाद करायचा आहे, व्यक्तिगत विकास साधायचा आहे, संघटना वाढवायची आहे ,हे वर्ष आव्हानात्मक आहे समोर निवडणुका आहेत , सोशल मीडियावर आपल्याला ऍक्टिव्ह राहायचं आहे. नॉन पॉलिटिकल कार्यक्रम घ्या, आदिवासी महिलांसोबत विविध कार्यक्रम घ्या, रोज चार चांगले बोलणारे व आवडणाऱ्या नेत्यांचे भाषण ऐका, आयुष्यात नेता बनू नका कार्यकर्तापणा असं म्हणत ताईंनी जिल्हा कार्यकारणी व मंडल कार्यकारणी मधील कोण कोण उपस्थित आहे, महामंत्री कोण आहे ,उपाध्यक्ष किती उपस्थित आहेत, मंडळ अध्यक्ष किती आलेत , जिल्ह्याची व मंडलाची शेवटची बैठक कधी झाली तुम्ही तुमच्या महिला मोर्चा कडून जिल्ह्यातले व मंडला तले कुठले प्रश्न सोडवले यासंदर्भात संपूर्ण आढावा घेतला. याप्रसंगी संध्याताई गुरनुले यांनी महिला आघाडी सशक्त आणि सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या असे मार्गदर्शन केले. रेणुका ताई दुधे यांनी बचत गटाचे महिलांना एकत्रित करून कार्यक्रम राबवा व त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्या असे सांगितले. दुसऱ्या सत्रामध्ये प्राध्यापक रत्नमाला ताई भोयर यांनी दत्तक अंगणवाडी आणि केंद्रीय अर्थसंकल्पयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले तर जयश्री गणोरकर यांनी जी ट्वेंटी या विषयावर अतिशय सविस्तर माहिती देत *जी ट्वेंटी काय आहे हे महिलांना समजून सांगितले नीलम सुरमावार यांनी धन्यवाद मोदीजी ही संकल्पना महिलांना समजून सांगितली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारचा अभिनंदनचा ठराव वंदना आगरकर यांनी मांडला तर शोभा बबनवाडे यांनी त्याला अनुमोदन दिले रंजना किनके यांनी महिलांना सोशल मीडिया संदर्भात सर्व माहिती देत त्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्का आत्राम यांनी केले संचालन संजीवनी वाघरे यांनी केले तर आभार सायरा शेख यांनी मानले. याप्रसंगी नोंदणी समिती, भोजन समिती, स्वागत समिती या व्यवस्थेत कार्य करणाऱ्या महिलांचा फुल देऊन सन्मान करण्यात आला.बैठकीला जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका शहराध्यक्ष महामंत्री जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि प्रमुख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने