पत्नी माहेरी गेल्याने नैराश्येतून युवकाने घेतला गळफास #chandrapur

Bhairav Diwase
0


बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील एका २८ वर्षीय युवकाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

आशिष महेंद्र इसनकर (२८), असे मृत युवकाचे नाव आहे. आशिष हा वाॅर्ड क्र. १ मध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. बुधवारी सकाळी ९ वाजेदरम्यान नायलॉन दोरीने त्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरात आरडाओरड झाली असता घराशेजारील काही तरुणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून धाव घेतली. त्याला लगेच गळफासातून मुक्त केले. तत्काळ स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोग्य केंद्र गाठून घटनेचा पंचनामा केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मात्र, त्याची पत्नी त्याला सोडून गेली असून त्याबाबत महिला निवारण कक्षात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे समजते. पत्नी सोडून गेल्याच्या मानसिक नैराश्येतून त्याने आत्महत्येचे कठोर पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)