Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मंडळ अधिकारी आणि कोतवाल यांना लाच मागणी प्रकरणात अटक #chandrapur #ACB #chimur #arrested


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


चंद्रपूर:- ‌तक्रारदार हे मौजा डोंगरगाव, ता. चिमुर येथील रहीवासी असून तक्रारदार यांचे आजोबाचे नावे मौजा डोंगरगाव येथे असलेल्या गट क्रमांक १५१/१ मध्ये ०.९० हे. आर. शेतजमीनीचे फेरफार आजोबाचे मृत्युपत्रानुसार तक्रारदार यांचे नावावर करून देण्याचा कामाकरीता बुराडे, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय, शंकरपूर ता. चिमूर, जि. चंद्रपूर यांनी तक्रारदार यांचेकडे ७०००/-रू लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची श्री. बुरांडे यांना लाच म्हणून ७०००/-रु. देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्यांचे विरुद्ध लाप्रवि कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक १७/०१/२०२३ व दिनांक १८/०१/२०२३ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान गै. अ. धनंजय लुमदेव बुराडे, मंडळ अधिकारी, शंकरपूर, ता. चिमुर, जि. चंद्रपूर यांनी लाचेची मागणी केली व गै.अ. राहूल सिध्दार्थ सोनटक्के, कोतवाल, तलाठी कार्यालय, किटाळी, ता. चिमुर, जि. चंद्रपूर यांनी गै.अ. धनंजय लुमदेव बुराडे, मंडळ अधिकारी, शंकरपूर, यांना लाच देण्यास अपप्रेरणा देवून तडजोडीअंती ५,०००/-रु. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आज दि. २३/०२/२०२३ रोजी पो.स्टे. भिसी, ता. चिमर, जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर, पो.नि. जितेंद्र गुरनुले तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकों, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, पोकॉ. राकेश जांभुळकर, अमोल सिडाम व चापोकॉ सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशरी फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत