महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50% सूट #chandrapur

Bhairav Diwase

भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी लालपरीची सवारी, महिला घेई भरारी...... नारे देत आनंद व्यक्त केला

चंद्रपूर:- भाजपा महिला मोर्चा महानगर, चंद्रपूर तर्फे ना. शिंदे साहेब मुख्यमंत्री, ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि ना. सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री यांनी महिलांच्या एसटी प्रवासात तिकीट 50 टक्के सवलत केली. त्या बद्दल त्यांचे आभार मानून अभिनंदन केले.


चंद्रपूर बस आगारात जाऊन लालपरीची सवारी, महिला घेई भरारी...... महिला के सन्मान मे, सरकार मैदान मे..... एकच चर्चा, महिला मोर्चा...भारत माता की जय नारे देत महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर यांचे नेतृत्वात आनंद व्यक्त केला.

बस ने प्रवास करणाऱ्या महिला मोर्चानी जाणून घेतले सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या की महिला दिवसानिमित्त सरकारने आम्हाला 50 टक्के सवलत देऊन अनोखी भेट दिली आहे.सर्व प्रवासी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

या वेळी महामंत्री शीला चव्हाण, उपाध्यक्षा चंद्रकला सोयाम, रेणू घोडेस्वार, प्रभा गुडधे, विशाखा राजूरकर, नगर सेविका माया उईके, शीतल गुरनुले, पुष्पा उराडे, उज्वला नगराळे आदी महिला मोर्चा पदाधिकारी यांची उपस्थिती होती