"एकतेचे बळ" संकल्पना मनात ठेवून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

पोंभुर्णा:- चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टीट्युशन्स अंतर्गत चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा, पोलिस विभाग पोंभुर्णा आणि तहसील कार्यालय पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी बुधवारला "आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.   याप्रसंगी मंचावर डॉ. राजीव वेगीनवार, प्राचार्य, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, डॉ. एन. एच. पठाण, प्राचार्य, चिंतामणी महाविद्यालय, डॉ. एम. नक्षीणे, प्राचार्य, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स  डॉ. मेघा कुळकर्णी महिला समूह अध्यक्षा, डॉ. शीला नरवाडे सिनेट सदस्या, डॉ. पुर्णिमा मेश्राम अंतर्गत तकार निवारण समिती. समन्वयक उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्ती म्हणून सौ. सुलभा पिपरे, नगराध्यक्षा, अल्का आत्राम माजी सभापती पंचायत समिती, सौ. अर्चना माशीरकर गटशिक्षण अधिकारी, सौ. सोनु दिवसे तांत्रिक कृषी सहायक, कृषी मंडळ विभाग, डॉ. सौ. वर्षा खोब्रागडे, मेडीकल ऑफीसर डॉ. सौ. वंदना बावने, मेडीकल ऑफीसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोंभुर्णा सौ. किरणताई डाखरे, सरपंच ग्रामपंचायत, सोनापूर आष्टा, प्रा. पुनम मांडवकर, प्रा. प्राचार्या चिंतामणी ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स, सौ. सीताताई कस्तुरे, ईश्वरी उराडे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर मार्गदर्शन पर भाषणाला सुरूवात झाली. सुलभा पिपरे नगराध्यक्षा, अल्का आत्राम, माजी सभापती पंचायत समिती, सौ. अर्चनाताई माशीरकर गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना "महिला दिन व विकास" म्हणजेच महिला सबलीकरण या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक ठाणेदार धर्मेंद्र जोशी पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांनी आजच्या काळातील मुलामुलींच्या समस्या उदाहरण देऊन सांगितले, सोबतच मुलींनी कसे खंबीर रहायला पाहिजे हे पण समजावून सांगितले. डॉ. वर्षा खोब्रागडे आणि डॉ. वंदना बावने मेडीकल ऑफीसर प्राथमिक आरोग्य केंद्र, पोंभूर्णा यांनी व्यक्तिगत विकासाची पहिली पायरी म्हणजे उत्तम आरोग्य होय असे सांगितले. सौ. सोनु दिवसे, कृषी सहायक यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांसाठी कशी तयारी करावी तर सौ. किरण डाखरे सरपंच यांनी प्रत्येक महिलेनी आपला बचाव कसा करावा असे समजावून सांगितले. याप्रसंगी सर्व कर्तृत्ववान महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.


डॉ. राजीव वेगीनवार, प्राचार्य यांनी विद्यार्थिनींना थोर महिलांचा आदर्श बाळगून स्वतःचे व्यक्तिमत्व कसे विकसित करावे हे समजावून सांगितले तर डॉ. एम. टी नक्षिने सरांनी आपल्या संस्कृतीचा आदर बाळगून उच्चस्तरावर जाण्याची प्रेरणा बाळगावी असे आव्हान केले. डॉ. एन. एच. पठाण सरांनी विद्यार्थ्यांना मनात उच्च ध्येय बाळगून स्पर्धात्मक जगात कसे रहावे हे समजावून सांगितले.


याप्रसंगी कु. काजल मंकीवार ( जिजाऊ माता) कु. जया वासेकर (झाशीची राणी) कु. अनिषा अलोणे (रमाई) कु. निखिलेश्वरी गेडाम (राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील) इ. विद्यार्थिनींनी थोर महिलांच्या भूमिका साकारल्या.


कार्यक्रमाचे संचालन प्रा. सतीश पिसे, ग्रंथालय प्रमुख तर आभारप्रदर्शन डॉ. संघपाल नारनवरे, शारिरीक शिक्षण संचालक यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परमानंद बावनकुळे मराठी विभाग प्रमुख यांनी केले. प्रा. डॉ. वैशाली मुरकुटे, प्रा. डॉ. सुप्रिया वाघमारे, प्रा. वर्षा शेवटे, प्रा. सरोज यादव, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम सफल झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या