Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

युवक राष्ट्रवादीचे दारू दुकानाला ना-हरकत देण्यास विरोध #chandrapur #Korpana #Gadchandur


जिल्हाधिकाऱ्यासहीत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन


कोरपना:- नगर परिषद गडचांदुर गाजत असलेला दारू विषयावर आणि सामाजिक संघटना व काही पक्षांनी विरोध दर्शविला असो गडचांदूर येथील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन दारू दुकानात ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला दि. १५/०३/२०२३ मासिक सभेतील विषय सूचित विषय क्र. २६ असणारा प्रस्तावित देशी दारू दुकानाला नाहरकत मिळण्याबाबतचा विषय असून त्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस गडचांदूर च्या वतीने विरोध दर्शविला आहे.

ज्या ठिकाणी प्रस्तावीत देशी दारूचे दुकान येणार आहे. ते ठिकाण वरदळीचे असून त्या रस्त्यावर जड वाहतूक करणारी वाहणे ये-जा करतात त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. तसेच तेथे बस थांबा असून लगतच्या गावातील विद्यार्थी बस ची वाट पाहत तिथे थांबतात तसेच त्या ठिकाणी १०० मिटर च्या आत मध्ये अनाथ मुलांचे वसतीगृह असून त्यात मुली ची संख्या जास्त आहे. भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच आजुबाजुला प्रतिष्ठीत नागरीकांची वास्तव्य आहे. प्रस्तावीत देशी दारू दुकानास नाहरकत देऊ नये. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे वैभव गोरे, दिनेश डांगी,विनोद तराळे,अनिल पिंपळकर,सदानंद गिरी,महावीर खटोड यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत