काष्ठपूजन व भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी व्हावे

Bhairav Diwase

भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांचे आवाहन

चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सागवन काष्ठ प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येला आज रवाना होणार आहे. रामायणात ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे. त्या दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हे काष्ठ पाठविण्याचा आनंदोत्सव चंद्रपूर आणि बल्लारशामध्ये आज साजरा होणार आहे. चंद्रपूरातील शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहावे असे आवाहन भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चंद्रपूर शहर आणि बल्लारपूर शहर सज्ज झाले असून, ठिकठिकाणी होणाऱ्या शोभयात्रेसाठी स्वागतकमानी, पताका, भगवे झेंडे लावण्यात आले असून मार्गावर रामधून सुरू असून वातावरण राममय झाले आहे. आयोजनासाठी शेकडो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या परिश्रम घेत आहेत.