'आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री राधा सागर आज चंद्रपूरात #chandrapur


चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील फॅशन डिझाईन विभागातर्फे "फॅशन सफारी-2023" कार्यक्रमाचे आयोजन दि. २९ मार्च २०२३ला स्व. राजेश्वरराव पोटदुखे खुले नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री राधा सागर प्रसिद्ध टीव्ही मालिका अभिनेत्री मुंबई उपस्थित राहणार आहेत.

राधा सागर ही एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे. ती मलाल (2019), ठाकरे (2019) आणि नती खेल (2017) साठी प्रसिद्ध आहे. मार्च 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला इंटरनॅशनल गोल्डन गेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. सागर हे मराठी टेलिव्हिजन उद्योगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व देखील आहे.

अभिनेत्री राधा सागर ही स्टार प्रवाह या वाहिनीवर “आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये अंकिता नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसते. त्यासोबतच अभिनेत्री राधा सागर ही &TV वाहिनीवरील “एक महानायक डॉक्टर आंबेडकर”या मालिकेमध्ये चंपा नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत