अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची केली मागणी #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अधिसभा १२ मार्च व १४ मार्च २०२३ रोजी संपन्न झाली. या आधिसभेत गोंंडवाना विद्यापीठाच्या परीक्षेतील मूल्यमापन पद्धतीच्या सावळा गोंधळाच्या विरोधात व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.

चुकीच्या मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास होण्याची वेळ येते. विद्यापीठाच्या सदोष मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे मूल्यमापन करताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ज्याप्रमाणे आदर्श उत्तरपत्रिका मॉडेल Answer शीट व गुणदान योजना जाहीर करून परीक्षांचे मूल्यमापन करते. त्याच धर्तीवर विद्यापीठाने सर्व परीक्षांचे मूल्यमापन आदर्श उत्तरपत्रिका व गुणदान योजनेसह करावे अशी मागणी व्यवस्थापन परिषद तथा सिनेट सदस्य गुरुदास कामिडी यांनी सभागृहात लावून धरली. या मागणीला पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. या संदर्भात मा. कुलगुरूंनी अभ्यास मंडळ व विद्वत्त परिषदे,समोर सदर विषय ठेवून कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहाला मा. कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी दिले.

विद्यापीठच्या सर्व परीक्षा घेताना मूल्यमापनामध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो आहे आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नुकत्याच झालेल्या एमबीए परीक्षेच्या चुकीचा मूल्यमापनामुळे विद्यापीठांच्या विरोधात अनेक आंदोलने झालेली होती, विद्यापीठा विरोधात विद्यार्थ्यांचा असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष दूर करण्यासाठी विद्यापीठाने परीक्षांचे मूल्यमापन करण्यासाठी कायमस्वरूपी योजना आखणे गरजेचे आहे . यासाठी विद्यापीठाने सर्व परीक्षांचे मूल्यमापन करताना आदर्श उत्तरपत्रिका व गुणदान योजना जाहीर करणे गरजेचे आहे. असे मत व्यवस्थापन परिषद तथा सिनेट सदस्य सदस्य गुरुदास कामडी यांनी सभागृहात जोरकसपणे मांडली. आणि हा विषय सभागृहात लाऊन धरला. आणि याचीच परिणीती म्हणून मा. कुलगुरूंनी परीक्षांचे मूल्यमापन करण्यासाठी आदर्श उत्तरपत्रिका व गुणदान योजना यासाठी अभ्यास मंडळ व विद्वत्त परिषदेचे मत विचारत घेऊन आगामी काळात परीक्षांचे मूल्यमापन आदर्श उत्तरपत्रिका व गुणदान योजना यानुसार करण्याचे आश्वासन सभागृह दिले.