Top News

शिक्षकांच्या संप काळात सरपंच झाला शिक्षक #chandrapur #sindewahi


वाकल ग्रा.पं.चा प्रेरणादायी सरपंच


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत वाकल येथील ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेत चक्क सरपंच वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.कर्तव्या सोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणार हे व्यक्तिमत्व इतरांसमोर आदर्श निर्माण करणाचं आहे.

गावातील नागरिकांनी राहुल पंचभाई यांच्या कर्तृत्वावर प्रभावित होऊन त्यांना गावाची जबाबदारी सांभाळण्या करिता सरपंच म्हणून निवडून दिल.राहुल हा आधीपासूनच समाजकार्याचा प्रियकर असल्याने त्याने गावात अनोखे उपक्रम शालेय विद्यार्थाकरिता राबवीत असतात.नुकताच त्यांनी राष्ट्रीय सणाला गावातील राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान सुद्धा त्यानीं गावातील गुणवंत विद्यार्थाला दिला होता.त्यांच्या अशा नवनवीन उपक्रमाने विद्यार्थी हे प्रेरित होऊन शिक्षणाला अधिकच महत्व देत आहेत.अशातच राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनसाठी संप सुरु असल्याने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक त्यात सहभागी झाले आहेत.तसेच गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चार पाच दिवसापासून शिक्षक शाळेत नाहीत.त्यामुळे माझ्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत माझ्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून चक्क सरपंच शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. सोबतच गावातील आठ तरुण सुद्धा त्याठिकाणी जाऊन मुलांना शिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या शिक्षका अभावी बंद आहेत.मात्र वाकल ग्राम पंचायतचे सरपंच स्वयंप्रेरणेने पुढाकार घेत शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे शिकवणारा सिंदेवाही तालुक्यातील सद्या घडीला एकमेव सरपंच दिसत आहे. ह्या सरपंच्याच्या कृतीने तालुक्यातील व जिल्हातील सरपंच्या समोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

खांद्यावर गावातील नागरिकांनी खूप मोठी जबाबदारी दिली. ती पार पाडत असतांना माझ्या गावातील नागरिकांच्या शाळकरी मुलांची वेळ ही आधीच कोरोनाने दोन वर्ष हिरावून नेली.त्यातल्या त्यात ह्या सरकार व कर्मचाऱ्यांच्या लढाईत त्यांच्या शालेय जीवनातील मौलीक वेळ वाया जाऊ नये.म्हणून मी स्वतः सहभाग घेत विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरवात केली आहे.

चंद्रपूर जिल्हातील गावात सुद्धा सरपंच्यानी शालेय विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील मौलीक वेळ न हरवता त्यांनी सुद्धा आपल्या गावात ह्या करिता पुढाकार घ्यावा.अशी कडकडीची विनंती सुद्धा राहुल पंचभाई सरपंच ग्रा.पं. वाकल यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने