Top News

चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी #chandrapur #rain


चंद्रपूर:- मागील दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असताना शनिवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली. मार्च महिना सुरू होताच शहरात कडक उन्हं तापायला सुरुवात झाली होती.

मात्र मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. उन्हाचा पारा ४२ अंशाच्या समोर गेला असताना ढगाळ वातावरण मुळे गारवा आहे. अशातच शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या.

त्यानंतर मध्यरात्री देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जवळपास १० ते १५ मिनिट पाऊस सुरू होता. रिमझिम पाऊस सुरूच असून ढगाळ वातावरण कायम आहे. आकाशात काळे ढग जमा आहेत. त्यामुळे 1-2 दिवसात कधीही पाऊस कोसळू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने