Top News

चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार पहिला 'ट्रान्सजेंडर' पोलीस! #Chandrapur #police


चंद्रपूर:- आजही समाजात 'ट्रान्सजेंडर'ला वेगळे मानले जाते. 'ट्रान्सजेंडर: देखील समाजाचा एक भाग आहे, असे कायद्याने सांगितले आहे. असे असतानाही समाजात त्यांना योग्य स्थान मिळत नसल्याने ते निराश आहेत. मात्र, आता या निराशेसाठी आनंदाची दारे खुली झाली आहेत. आता सरकारी नोकऱ्यांमध्ये ‘ट्रान्सजेंडर’चाही समावेश केला जात आहे.

असाच आनंद चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील एका ‘ट्रान्सजेंडर’ला मिळाला आहे. पोलीस हवालदार पदासाठी शारीरिक चाचणी उत्तीर्ण होऊन आता हा ‘ट्रान्सजेंडर’ पोलीस होणार आहे. आतापर्यंत पोलीस खात्यात फक्त स्त्री-पुरुषच काम करत होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ‘ट्रान्सजेंडर’चा पोलीस खात्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.

नुकतीच चंद्रपूर पोलीस विभागामार्फत पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हरच्या २७५ रिक्त जागांसाठी पोलीस भरती करण्यात आली. यामध्ये एकूण २१ हजार २२२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते.यामध्ये जिल्ह्यातील एकमेव ट्रान्सजेंडरने ऑफलाइन अर्ज केला होता. तो शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाला आहे. त्यासाठी काही निकष लावण्यात आले होते. जे त्यांनी आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन पूर्ण केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील पहिले ट्रान्सजेंडर पोलिस तयार होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. लेखी परीक्षा 2 एप्रिल रोजी होणार असून त्याने उत्तीर्ण होण्यासाठी जोमाने तयारी सुरू केली आहे.

पोलीस भरतीदरम्यान ट्रान्सजेंडरसाठी निकष निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार त त्याचा अर्ज मंजूर करण्यात आला. शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यात तो उत्तीर्ण झाला. जिल्ह्यातील तो एकमेव ट्रान्सजेंडर आहे.
रवींद्रसिंह परदेशी,
जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने