Top News

'विद्यापीठ आपल्या दारी ' #chandrapur #gadchiroli #Gondwanauniversitygadchiroli


गडचिरोली:- प्राथमिक ते उच्च शिक्षणासंदर्भात सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणातील विद्यार्थी गळती व वाढ यावर चर्चा होत आहे.

मात्र, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागातील अनेक गावातील युवकांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण दिसून येत नाही. तसेच बर्‍याच विद्यार्थ्यांचे शिक्षण हे अर्ध्यातून सुटलेले असते. ही बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून 'विद्यापीठ आपल्या दारी' हा अभनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा राज्यातील पहिला प्रयोग असून रात्रीच्या शाळेप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

धानोरा तालुक्यांतर्गत जांभळी येथे आदर्श पदवी महाविद्यालयाद्वारे आयोजित 'विद्यापीठ आपल्या दारी' या उपक्रमाचे उद्घाटन 27 मार्च रोजी जेष्ठ समाज सेवक देवाजी तोफा यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विशेष अतिथी प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. अनिल चिताडे, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार, विद्या बोकारे, जांभळी ग्रामपंचायतचे सरपंच विलास कुंबरे आदी उपस्थित होते.

यावेळी देवाजी तोफा यांनी म्हटले की, गोंडवाना विद्यापीठाचे उपक्रम अतिशय समाज उपयोगी आहेत. विद्यापीठाला लाभलेले कुलगुरू हे गडचिरोली जिल्ह्यासाठी मार्गदर्शक आहेत. अधिकारी येथील आणि जातील मात्र, त्यांनी निर्माण केलेल्या कामाची पावती सातत्याने प्रत्येक माणसापर्यंत टिकून राहते. त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे गोंडवाना विद्यापीठाने निर्माण केलेला हा दूरदृष्टीकोण उपक्रम 'विद्यापीठ आपल्या दारी' होय. University at your Door त्यामुळे प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासात विद्यापीठाची भूमिका मोलाची असल्याचेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले की, प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षण हे स्वतःच्या सर्वांगीण विकासाकरिता व समाजाच्या विकासाकरिता अतिशय पूरक माध्यम असणारे शास्त्र आहे. गावाच्या मागासलेपणावर शिक्षण हे एक मात्र साधन निर्माण व्हावा म्हणून गोंडवाना विद्यापीठाने 'विद्यापीठ आपल्या दारी' या उपक्रमाची जोड निर्माण करून गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये एक पाऊल पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हणाले.

यावेळी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, डॉ. मनीष उत्तरवार, विलास कुमरे, पुरुषोत्तम बावणे यांनीही मनोगत व्यक्त केले. या उपक्रमांतर्गत जांभळी ग्रामपंचायतीमध्ये महाविद्यालय सोडलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेशित करून या उद्घाटना नंतर प्रत्यक्ष वर्ग भरून क्लासेस सुरू करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शशिकांत अस्वले यांनी केले. संचालन डॉ. संदीप लांजेवार यांनी तर आभार डॉ. नंदकिशोर माने यांनी मानले.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #Adharnewsnetwork #bhairavdiwase #Wardha #crimepatrol #crimenews #crime #police #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #nagpur #pombhurna #Gondwanauniversitygadchiroli #sardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #spchandrapur #UniversityatyourVillage #Universityatyourdoor 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने