२ एप्रिलला चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई लेखी परिक्षा होणार #chandrapur

Bhairav Diwase
0

मातोश्री विद्यालय चंद्रपूर आणि सेंट मायकल स्कुल चंद्रपूर या दोन ठिकाणी होणार


चंद्रपूर:- जिल्हा पोलीस शिपाई २०२१ साठी घेण्यात आलेल्या शारिरीक चाचणी मध्ये विहीत गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व लेखी परिक्षा करीता पात्र ठरलेल्या उमेदवारापैकी चेस्ट क्रमांक २८१८ ते १०७१५ असे एकुण १०३९ पुरुष उमेदवारांची लेखी परिक्षा ०२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८:३० वाजता मातोश्री विद्यालय, चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

तसेच चेस्ट क्रमांक १०७१६ ते १६४८१ असे एकुण ४५५ पुरुष उमेदवार आणि चेस्ट क्रमांक १२८७७ ते १७०४० असे एकुण ६४४ महिला व ०१ तृतीयपंथी उमेदवार यांची लेखी परिक्षा ०२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८:३० वाजता सेंट मायकल स्कुल, दवाबाजार जवळ, रामनगर रोड चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.

लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. तसेच त्यांनी आवेदन अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविण्यात येत आहे. लेखी परिक्षेसाठी उमेदवारांनी वरील नमुद संबंधीत परिक्षा केंद्रावर परिक्षेच्या ०२ (दोन) तास अगोदर म्हणजे ०२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०६:३० वाजेपर्यंत ०२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी पोहचणे आवश्यक आहे.

#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #gondpipari #pombhurna #nagpur #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)